Red Alrt बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास थांबला आहे. यामुळे, येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. २३ ते २९ सप्टेंबर दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे.
राज्याच्या अनेक भागांत पावसाचा मोठा परिणाम Red Alrt
या मान्सूनच्या परतीमुळे मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचा मोठा परिणाम जाणवणार आहे. सध्या अनेक ठिकाणी पाऊस सुरू असल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा
या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी शेतीमालाची काळजी घ्यावी आणि शेतीत पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतीचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
याव्यतिरिक्त, नागरिकांनीही सतर्क राहावे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे आणि सुरक्षित ठिकाणी राहावे.
या आगामी पावसाच्या धोक्यामुळे, सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी तयार राहावे, अशी अपेक्षा आहे.
