महाराष्ट्र पोलीस भरती २०२५: १५,३००+ जागांसाठी मेगा भरती! आजच करा अर्ज ! Police Bharti 2025

Police Bharti 2025 नमस्कार , नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे! महाराष्ट्र राज्य पोलीस दलात (Maharashtra State Police Bharti 2025) तब्बल १५,३०० हून अधिक जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

राज्यात पोलीस शिपाई, वाहन चालक, एसआरपीएफ आणि कारागृह शिपाई यांसारख्या विविध पदांसाठी ही भरती होणार असून, ही सुवर्णसंधी साधण्यासाठी उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू करावी.

या लेखात, आपण भरतीचे सविस्तर तपशील, शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता, वयाची अट आणि अर्ज प्रक्रियेची माहिती पाहूया.

भरतीतील एकूण पदे आणि तपशील (Total Vacancies: 15300+) : Police Bharti 2025

मंडळाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, २०२५ च्या भरतीत विविध पदांसाठी एकूण १५,३०० हून अधिक जागा भरल्या जाणार आहेत.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
पोलीस शिपाई (Police Constable)१२,६२४
पोलीस शिपाई-वाहन चालक (Constable-Driver)५१५
पोलीस शिपाई-SRPF१,५६६
पोलीस बॅन्डस्मन (Bandsmen)११३
कारागृह शिपाई (Prison Constable)५५४
एकूणसर्व पदे१५,३००+

युनिटनुसार रिक्त जागा (Unit Wise Vacancies) :

राज्याच्या विविध पोलीस युनिट्स आणि SRPF गटांमध्ये जागांचे वितरण खालीलप्रमाणे आहे:

पोलीस शिपाई / चालक / बॅन्डस्मन (प्रमुख युनिट्स)

अ. क्र.युनिटपद संख्याअ. क्र.युनिटपद संख्या
मुंबई२,६४३२३छ. संभाजीनगर ग्रामीण५७
ठाणे शहर६५४२५परभणी९७
पुणे शहर१,९६८३५गडचिरोली७४४
नागपूर शहर७२५४०पालघर१६५
प्रमुखइतरविविधएकूण(अंदाजे)१३,७००+

पोलीस शिपाई-SRPF (राज्य राखीव पोलीस दल)

अ. क्र.SRPF गटपद संख्या
पुणे (गट १)७३
नागपूर (गट ४)५२
दौंड (गट ५, ७)२६९ (१०४ + १६५)
धुळे (गट ६)७१
गडचिरोली (गट १५)१७१
एकूणसर्व गट१,५००+

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

भरतीतील पदांनुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे निर्धारित करण्यात आली आहे:

  • पोलीस शिपाई, पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF आणि कारागृह शिपाई: इयत्ता १२वी उत्तीर्ण.
  • पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता १०वी उत्तीर्ण.

शारीरिक आणि वयाची अट :

उमेदवारांना शारीरिक तसेच वयाच्या अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

शारीरिक पात्रता (Physical Standards)

घटकपुरुष उमेदवारमहिला उमेदवार
उंची१६५ सेमी पेक्षा कमी नसावी१५५ सेमी पेक्षा कमी नसावी
छाती (फक्त पुरुष)न फुगवता ७९ सेमी पेक्षा कमी नसावी

वयाची अट (Age Limit) – ३० नोव्हेंबर २०२५ रोजी

पदकिमान वयकमाल वय
पोलीस शिपाई, बॅन्डस्मन, कारागृह शिपाई१८ वर्षे२८ वर्षे
पोलीस शिपाई-वाहन चालक१९ वर्षे२८ वर्षे
पोलीस शिपाई-SRPF१८ वर्षे२५ वर्षे

महत्त्वाची सूट: मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ०५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

शारीरिक परीक्षा आणि गुणदान (५० गुणांची परीक्षा) :

भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी ही एकूण ५० गुणांची असेल.

घटकपुरुष उमेदवारमहिला उमेदवारएकूण गुण
धावणी (मोठी)१६०० मीटर८०० मीटर२० गुण
धावणी (लहान)१०० मीटर१०० मीटर१५ गुण
बॉल थ्रो / गोळा फेकगोळा फेकगोळा फेक१५ गुण
एकूण५० गुण

शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल.

महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज शुल्क :

तपशीलतारीख/माहिती
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Online)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख३० नोव्हेंबर २०२५
परीक्षा तारीखनंतर कळविण्यात येईल
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र

अर्ज शुल्क (Application Fee) :

प्रवर्गशुल्क
खुला प्रवर्ग₹४५०/-
मागास प्रवर्ग₹३५०/-

तयारीचे नियोजन आताच सुरू करा!

पोलीस भरतीची प्रक्रिया मोठी असून स्पर्धा जास्त आहे. उमेदवारांनी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा या दोन्हीसाठी आतापासूनच कसून तयारी सुरू करावी. वेळापत्रक निश्चित झाले असल्याने, तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा द्या. Police Bharti 2025

Leave a Comment