लाडक्या बहिणींना दिवाळीचा हप्ता कधी ?मंत्री अदिती तटकरेंनी दिली माहिती! Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरू असले तरी, सध्या राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याला शासनाने सर्वात जास्त प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या पूरग्रस्तांना मदत देणे महत्त्वाचे

मंत्री अदिती तटकरे यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, “सध्याच्या पूरपरिस्थितीमध्ये नुकसानग्रस्त भागाला अधिकाधिक आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याला शासनाचे प्राधान्य आहे.”

‘लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता देण्यात यावा. याकरिता विभागाने मंजुरीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे आणि निधी लवकर प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे.”

हे पण वाचा:
PM किसान सन्मान निधी: नवीन लाभार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू; पण हे कठोर नियम लागू | PM Kisan Samman Nidhi Yojana

Ladki Bahin Yojana दिवाळीपूर्वी हप्ता मिळणार का?

लाभार्थी महिलांना दिवाळीपूर्वी हा हप्ता मिळेल का, या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. निधी प्राप्त झाल्यानंतर लगेच वितरण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री तटकरे म्हणाल्या, “ज्या क्षणाला निधी प्राप्त होईल, त्या वेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू. सणासुदीच्या कालावधीत जर ती (मंजुरी) आली, तर आम्हाला आनंदच आहे. पण ती जशी येईल, तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल.”

नुकसान भरपाईला सर्वोच्च प्राधान्य

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि सध्या यावरच सरकारचा अधिक भर असल्याचे तटकरे यांनी सांगितले. अतिवृष्टी आणि चक्रीवादळासारख्या संकटांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे.

हे पण वाचा:
HSRP नंबर प्लेट बुकिंग अपडेट: आता मुदतवाढ, दंड आणि बुकिंगची संपूर्ण माहिती | HSRP Number Plate Update

या योजनेअंतर्गत राज्यात सुमारे २ कोटी ३५ लाखांपेक्षा जास्त महिला लाभार्थी आहेत. प्राप्तिकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अडीच लाखांपेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या काही महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे, ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पुढील हप्त्याची रक्कम निधी उपलब्ध झाल्यावर त्वरित महिलांच्या खात्यात जमा केली जाईल, अशी माहिती मंत्री तटकरे यांनी दिली आहे.

Leave a Comment