ladki bahin eKYC : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. योजनेतील eKYC (ई-केवायसी) प्रक्रिया पूर्ण करताना OTP (वन टाईम पासवर्ड) बाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्यात येतील, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ही माहिती दिली. eKYC करताना महिलांना OTP मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या होत्या, ज्याची दखल विभागाने घेतली आहे.ladki bahin eKYC

आदिती तटकरे काय ladki bahin eKYC म्हणाल्या?
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते.”

त्यामुळे, ई-केवायसी करताना ज्या महिलांना ओटीपी मिळत नव्हता, त्यांना आता लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होणार आहे.

कुटुंबाच्या उत्पन्न पडताळणीमुळे लाभार्थींची संख्या घटणार?
एकिकडे तांत्रिक अडचण दूर होण्याची चिन्हे असताना, दुसरीकडे ई-केवायसी प्रक्रियेतील एका नव्या नियमामुळे योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे नवा नियम?
- कुटुंबाच्या उत्पन्नाची पडताळणी: लाभार्थी महिलेसोबतच आता तिच्या पतीचे किंवा वडिलांचेही eKYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- उत्पन्न मर्यादा: या ई-केवायसी प्रक्रियेद्वारे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न तपासले जाईल. योजनेच्या मुख्य अटीनुसार, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
अपात्र कोण ठरणार?ladki bahin eKYC
यापुढे लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासोबत पती (विवाहित असल्यास) किंवा वडिलांचे (अविवाहित असल्यास) उत्पन्न तपासले जाईल. जर कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आढळल्यास, त्या महिलेला योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल.

यापूर्वी केवळ लाभार्थी महिलेचे उत्पन्न पाहिले जात होते. मात्र, आता कुटुंबाच्या उत्पन्नाची कडक तपासणी केली जाणार असल्याने, अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. पात्र महिलांनी आपला लाभ अखंडित ठेवण्यासाठी, ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.





