E Pik Pahani
E Pik Pahani शेवटी शेतकऱ्यांची मागणी मान्य झाली! अतिवृष्टी आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलेल्या ई-पीक पाहणीसाठी राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. आता शेतकरी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पिकांची नोंदणी करू शकतील.
शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या
E Pik Pahani यावर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी उभी पिके वाहून गेली, तर काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या. अशा बिकट परिस्थितीत, शेतकरी २०२५ च्या खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी धडपडत होते. मात्र, सरकारी सर्व्हर सतत डाऊन होत असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.
अनुदान, पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण, तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित राहत होते. त्यामुळे शेतकरी संघटना आणि शेतकरी वर्गाकडून मुदतवाढ देण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
E Pik Pahani शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन आणि विभागीय आयुक्तांच्या विनंतीवरून राज्य सरकारने अखेर हा महत्त्वाचा निर्णय घेतला. १८ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत, राज्यातील पूरस्थिती आणि अतिवृष्टीची गंभीर परिस्थिती विचारात घेऊन, ई-पीक पाहणीची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता त्यांना पुरेशा वेळेत त्यांच्या पिकांची नोंदणी करता येईल, आणि त्यांना सरकारी योजनांच्या लाभांपासून वंचित राहावे लागणार नाही.
