महाराष्ट्र गारठला! ‘या’ जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा हाय अलर्ट; धुळ्यात पारा ६.२ अंशांवर. Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update: राज्यात सध्या थंडीचा कडाका (Cold Wave) जोरदार वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागात तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आजही आणि उद्याही राज्यात थंडीची लाट कायम राहणार असून, काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धुळ्यात हंगामातील निचांकी तापमानाची नोंद: Maharashtra Weather Update

राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचे प्रमाण सर्वाधिक जाणवत आहे. गेल्या २४ तासांतील आकडेवारी पाहिली असता, धुळे शहरात राजुयातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात पारा चक्क ६.२ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक हुडहुडीने भरले आहेत. हे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे.

प्रमुख शहरांमधील तापमानाची स्थिती (अंश सेल्सिअसमध्ये) :

राज्यातील इतर ठिकाणीही थंडीचा जोर वाढला असून, खालीलप्रमाणे तापमानाची नोंद करण्यात आली आहे:

  • धुळे: ६.२°C (सर्वात कमी)
  • जेऊर: ८.०°C
  • निफाड: ८.३°C
  • अहिल्यानगर (अहमदनगर): ९.५°C
  • नाशिक: ९.६°C
  • जळगाव: ९.८°C
  • गोंदिया आणि भंडारा: १०.०°C

हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा :

हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्याच्या विविध भागांत थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.

१. आज (Today Alert):

खालील जिल्ह्यांमध्ये आज थंडीच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे:

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया.

२. उद्या (Tomorrow Alert):

उद्या देखील खालील जिल्ह्यांत थंडीचा प्रभाव कायम राहील:

धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली.

शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी महत्त्वाचे :

सकाळी आणि रात्रीच्या वेळी गारठा जास्त असल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, रब्बी हंगामातील पिकांसाठी ही थंडी पोषक असली तरी, अति थंडीमुळे काही पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने पिकांची निगा राखावी. Maharashtra Weather Update

Leave a Comment